हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मागण्या मान्य करा अन्यथा बैलगाडी मोर्चा ! बिरसा आर्मीचा इशारा

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

युरिया व डीएपी खतांचा तुटवडा दूर करावा, अतिक्रमित वनजमिनीधारक शेतकर्‍यांना कर्जे मिळवून देण्यास सहकार्य करावे, स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतल्यानंतर ग्राहकांना पावत्या देणे बंधनकारक करावे आदि मागण्यांसाठी बिरसा आर्मी व आदिवासी शेतकर्‍यांनी 14 जुलैला प्रांताधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकार्‍यांना निवेदन देऊन बैलगाडी मोर्चा काढण्याचा इशारा दिला.

बिरसा आर्मीचे प्रदेशाध्यक्ष मनोज पावरा व शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तालुक्यातील युरिया, डीएपी 10:26:26 खतांची टंचाई दूर करावी, या खतांसोबत लिंकिंगच्या माध्यमातून दुय्यम खते घेण्याची सक्ती केली जात असून हा प्रकार बंद करावा, शासनाचे स्पष्ट आदेश असतांनाही अतिक्रमित वनजमिनीधारक शेतकर्‍यांना पीककर्जे देण्यास बँका टाळाटाळ करीत असून संबंधित अधिकार्‍यांना समज देण्यात यावी, स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतल्यानंतर शिधापत्रिका धारकांना पावती न देण्याचे प्रकार सुरु असून अशा दुकानदारांचे परवाने निलंबित करावेत, सात महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानापासून वंचित लाभार्थ्यांना तातडीने अनुदान द्यावे, नव्या शिधापत्रिका मागणीनुसार द्याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास बैलगाडी मोर्चा काढण्याचाही इशारा देण्यात आला.

निवेदन देतेवेळी मनोज पावरा, सुरेश पावरा, अशोक भिल, सरदार पावरा, काकड्या पावरा, कैलास पावरा, किस्मत पावरा, सुरेश ठाणसिंह पावरा, कैलास काकड्या पावरा आदि उपस्थित होते. युरियासंदर्भातील मागणीचे निवेदन तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांना देण्यात आले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!