हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गळा कापून वृद्ध दुकानदाराचा खून!

क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर  तालुक्यातील पिळोदा गावात किराणा दुकानदार वृद्धाची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना एक जुलैला रात्री साडेबाराला घडली. या हत्येत सहभागी असल्याचा संशय असलेला युवक फरारी झाला होता. त्याला नाशिक जिल्ह्यात देवळा येथे पोलिसांनी अटक केली. त्याने साथीदारासोबत ही हत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. खुनामागील कारण अद्यापही समोर येऊ शकलेले नाही.
याबाबत संजय भिकनसिंह परदेशी यांनी थाळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटल्यानुसार, त्यांचे काका गोपालसिंग बाबूसिंग परदेशी (वय 62) हे पिळोदा गावात किराणा दुकान चालवीत होते. त्यांचा मुलगा मुक्ताईनगर येथे शिक्षक तर मुलगी विवाहित असल्याने ते पत्नीसह गावात एकटे राहत होते. पत्नी बाहेरगावी गेल्याने 30 जूनला ते घरी एकटेच होते. रात्री बारा ते साडेबारादरम्यान त्यांच्या घरात धारदार शस्त्राने गळा कापलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. सहायक निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना घटनास्थळापासून रक्ताचे डाग जिन्याने वरपर्यंत गेल्याचे आढळले. त्यांचा माग काढत ते संशयित आकाश पवन इच्छे याच्या घरापर्यंत पोहचले. तपासात तो काही वेळापूर्वीच मोटारसायकलवरुन एकासोबत फरारी झाल्याचे स्पष्ट झाले. संजय परदेशी याने दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित इच्छे याच्याविरोधात थाळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  सकाळी पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, डीवायएसपी सुनिल गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर पोलिस विभागात  संशयिताचे वर्णन सर्वत्र कळवण्यात आले.
संशयिताच्या वर्णनाशी मिळत्याजुळत्या वर्णनाचा युवक देवळा (जि.नाशिक) पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती तेथील निरीक्षक सार्थक नेहेते यांना मिळाली. त्यांनी  संशयित आकाश पवन इच्छे (वय 22) याला ताब्यात घेतले. थाळनेर पोलिसांनी त्याचा ताबा घेतला असून ते थाळनेरकडे येण्यासाठी निघाले आहेत. त्याच्या चौकशीनंतरच या खुनामागचे खरे कारण निष्पन्न होणार आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!