हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मुकेश लोहारला नऊ गाड्यांसह अटक

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

26 हजार दर महिन्याला भाडे देतो असे सांगून तब्बल नऊ जणांच्या फोर व्हीलर नेऊन चुना लावण्याच्या प्रयत्नात गुन्हा दाखल असलेल्या मुकेश अशोक लोहार याला शहर पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून नऊ वाहने जप्त केली.

मुकेश अशोक लोहार (रा.आमोदे) याने राहुल बावा (रा.अहिल्यापूर) याला सोनगीर टोल प्लाझा अंतर्गत बांधकामासाठी गाड्या हव्या आहेत अशी बतावणी केली होती. त्याला 26 हजार रुपये भाडे देण्याचे आमिष दाखवून स्कॉर्पिओ व बॉलेरो पिकअप अशी दोन वाहने नेली होती. एक महिन्याचे भाडे दिल्यानंतर त्याने दुसर्‍या महिन्यापासून भाडे दिलेच नाही. त्यामुळे वाहने परत दे अशी मागणी बावा याने केली. मात्र वाहने देण्याबाबत लोहार चालढकल करीत होता. त्यामुळे बावा याने अधिक तपास केला असता लोहार याने यापूर्वी रमेश कासार, जयेश राजपूत, मुकेश राऊळ, सागर प्रकाशकर, हितेश कोळी यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे आढळले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक करुन कार, स्कॉर्पिओ, स्विफ्ट डिझायर, मारुती सियाझ कार, स्विफ्ट, महिंद्रा बॉलेरो, इको फोर्ड आदि 20 लाख 50 हजार रुपये किंमतीची नऊ वाहने जप्त केली.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक किरणकुमार परदेशी, उपनिरी़क्षक संदीप दरवडे, शोध पथकाचे हवालदार राजेंद्र रोकडे, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, प्रशांत पवार, विनोद आखडमल, मनोज दाभाडे, मनोज महाजन, भटू साळुंखे, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, सचिन वाघ, उमेश पवार यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!