हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अकरावीच्या प्रवेशासाठी लाच मागणाऱ्या शिक्षकांना अटक

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

दहावी उत्तीर्ण होऊन अकरावीत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या मुलाच्या पालकांकडून 20 हजार रुपयांची लाच मागून दहा हजार रुपये स्वीकारताना दोन उपशिक्षकांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

 

30 मे रोजी ही कारवाई करण्यात आली. गुलाब वीरभान साळुंखे व उल्हास भास्करराव बागुल अशी संशयितांची नावे असून ते दोघेही चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील गिरणा विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उपशिक्षक आहेत.

 

तक्रारदाराने याबाबत क्रार दिली होती. त्यानुसार त्याचा मुलगा दहावी पास झाला. त्याला मेहुनबारे उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावी सायन्सच्या वर्गात प्रवेश हवा होता. 27 मे रोजी ते विद्यालयात गेले असता गुलाब साळुंखे व एका लिपिकाने त्यांना प्रवेशासाठी वीस हजार रुपये द्यावे लागतील, त्यातील दहा हजार रुपये ऑनलाईन अर्ज केल्यावर तर उर्वरित दहा हजार रुपये शाळेत प्रवेश घेताना द्यावे लागतील, त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही असे सांगितले. तसेच पैसे घेण्याबाबत संस्थेचे सचिव आणि संचालक यांनी सूचना दिल्या आहेत अशी ही माहिती त्यांनी दिली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने धुळे येथील लाच लूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. विभागाने तक्रारीची खातरजमा केली. 30 मे रोजी तक्रारदाराकडून दहा हजार रुपये घेताना दोघांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजन कदम व संतोष पावरा यांनी ही कारवाई केली. संस्थाचालकच शाळेत प्रवेशासाठी पैसे मागण्यास शिक्षकांना प्रोत्साहन देत असल्याची घटना घडल्याने शैक्षणिक वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!