क्राइम ब्लास्ट ब्यूरो
तालुक्यातील पहिली सहकारी बँक असलेल्या दि शिरपूर मर्चंट को-ऑप बँकेची 13 कोटी 75 लाख 86 हजार 253 रुपयांत फसवणूक केल्याप्रकरणी 48 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात 25 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सनदी लेखापाल अजय नंदलाल राठी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, 23 लाख 50 हजार रुपयांचे आयबीपी कर्ज घेऊन बँकेची नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नऊ कोटी 78 लाख 64 हजार 510 रुपयांचे विनातारणी हायपोथिकेशन कर्ज घेतल्याच्या संशयावरुन 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोल्ड स्टोरेजसाठी तीन कोटी 73 लाख 71 हजार 743 रुपयांचे कर्ज घेतल्याप्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या कर्जदारांशी संगनमत करुन त्यांना कर्ज वितरण केल्याच्या संशयावरुन माजी अध्यक्ष प्रसन्न जैन, व्यवस्थापक संजय कुलकर्णी, महेश गुजराथी, दिलीप कापडी, तत्कालीन कर्ज अधिकारी, अकाऊंटंट व कर्ज वसुली अधिकारी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. डीवायएसपी सुनिल गोसावी तपास करीत आहेत.