हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मुलाकडून आईचा खून !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

माशांची भाजी कुत्र्याने खाल्ल्याच्या क्षुल्लक कारणावरून संताप्त झालेल्या मुलाने आईचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना 24 मे रोजी रात्री आठ वाजता शिरपूर तालुक्यातील ताजपुरी शिवारात घडली. संशयित मुलगा फरारी झाला असून थाळनेर पोलीस त्याचा शोध घेत आहे

तालुक्यातील वाठोडे गावातील रहिवासी देवेंद्र भिलेसिंग राजपूत यांचे ताजपुरी शिवारातील शेत आहे. तेथे जागलीसाठी आदिवासी कुटुंब राहते. त्यातील अवलेश रेबला पावरा याने आई टिपाबाई रेबला पावरा (वय 67 वर्ष) हिला माशांची भाजी करायला सांगितली होती. तिने भाजी तयार करून ठेवली. मात्र शेतातील कुत्र्याने येऊन भाजी खाल्ली. त्याचा राग आल्याने अवलेश याने लाकडी दांड्याने तिला मारहाण करून तिचा खून केला. याबाबत थाळनेर पोलीस ठाण्यात अवलेश पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!