क्राइम ब्लास्ट ब्यूरो
बेकरीचा दरवाजा तोडून बेकरीवाल्याला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून त्याच्या गल्ल्यातील पैसे लुटून नेल्याची खळबळजनक घटना शिरपूर शहरातील चतुर्भुज चाळ येथे घडली.
संशयिताविरोधात शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील भंडारी टाकीजवळ चतुर्भुज चाळ आहे. तेथील बॉम्बे बेकरीमध्ये 10 ते 11 मे दरम्यान रात्री हा प्रकार घडला. बेकरी मालक रमजान अलीहसन अली अन्सारी (वय 63, रा.क्रांतीनगर, शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित शुभम शरद माळी (वय 28, रा.चतुर्भुज चाळ, शिरपूर) हा त्यांच्या बेकरीचा दरवाजा तोडून आत आला. त्याने रमजान अली यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांना चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या गल्ल्यात ठेवलेले 1800 रुपये काढून घेतले व निघून गेला. त्याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक सुरेश सोनवणे तपास करीत आहेत.