हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

लाचखोर पोलिस पाटील एसीबीच्या जाळ्यात !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

गुन्ह्याचा तपास लवकर करून कोर्टात चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिसांना 10 हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी करून लाच स्वीकारताना साक्री तालुक्यातील बळसाने येथील पोलीस पाटील आनंदा भटू पाटील याला सहा मे रोजी धुळे येथील प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

याबाबत तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या विरोधात पत्नीने पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास लवकर करून चार्जशीट कोर्टात दाखल करायचे असेल तर पोलिसांना 10 हजार रुपये द्यावे लागतील असे संशयित आनंदा पाटील याने तक्रारदाराला सांगितले होते.

16 एप्रिल रोजी याबाबतची मागणी करण्यात आली. अखेर 8 हजार रुपयांवर तडजोड झाली. तक्रारदाराला लाच द्यावयाची इच्छा नसल्याने त्याने धुळे येथे एसीबीकडे तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करून ती खरी असल्याचे निष्पन्न झाले.

सहा मे रोजी या रकमेपैकी दोन हजाराचा हप्ता स्वीकारताना संशयिताला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व सहकाऱ्यानी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!