हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मॅनेजर कुलकर्णी हादेखील व्हिलन, गुन्हा दाखल करा !

 

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

तत्कालीन अध्यक्ष प्रसन्न जैन यांच्या गैरव्यवहारांमुळे धोक्यात आलेल्या दि शिरपूर मर्चंट बँकेचा मॅनेजर संजय केशवराव कुलकर्णी यानेही सभासद व बँकेचा विश्वासघात केला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सभासदांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या बँक बचाव समितीने पोलिसांकडे तक्रारवजा निवेदन देऊन केली आहे.

निवेदनात म्हटल्यानुसार, बँकेने अनेक प्रकारची असुरक्षित कर्जे देण्यात आली आहे. महाराष्ट्र सहकारी कायदा, उपविधी व रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सर्व नियम-कायदे डावलून हे कर्जवाटप झाले आहे. चेअरमन प्रसन्न जयराज जैन यांनी आपल्या सख्ख्या भावाला नियमबाहय कर्ज दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी त्यांना अपात्र ठरविले आहे. राकेश रमेश धाकड़ या सभासदास कोणतीही कागदपत्रे न घेता 50 लाख रूपये कर्ज दिले आहे. तसे लेखापरिक्षण अहवालात नमूद केले आहे. ही व अशी अनेक विनातारणी नियमबाह्य कर्ज प्रकरणे असल्याने या बँकेची 77 टक्के थकबाकी वाढली आहे. परिणामी बँकेतील ठेवी व बँकेचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

संचालक मंडळाने कर्ज मंजूर केले तरी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता करूनच कर्जदाराला रक्कम देण्याची जबाबदारी पगारी कर्मचारी व मॅनेजर म्हणून संजय कुलकर्णी यांची होती. त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करून सभासद व बँकेची मोठी फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. अनेक संशयास्पद कर्ज प्रकरणांबाबत काही संचालकांनी इतरांच्या नावाने लाखो रूपये कर्ज घेतले असल्या संदर्भात कसून चौकशी व्हावी. संजय कुलकर्णीवर गुन्हा दाखल करुन अटक झाल्यास या गैरव्यवहाराबाबत बरीचशी माहिती मिळू शकेल असे बँक बचाव समितीचे पदाधिकारी गोपाल मारवाडी, ओंकार जाधव, हिराभाऊ कोळी आदिंनी निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!