हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

माहिती अधिकार कार्यकर्त्या डॉ.सरोज पाटील यांना मारहाण

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

जिल्ह्यातील सुप्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्या तथा धुळे जिल्हा जागृत जनमंच संघटनेच्या संस्थापक डॉ. सरोज पाटील यांना चार संशयितांनीं मारहाण केल्याची धक्कादायक घटना 29 ऑक्टोबरला दुपारी घडली.

संशयितांमध्ये एका महिलेचा समावेश असून तिने सरोज पाटील यांना ओढणीने गळफास लावण्याचाही प्रयत्न केला. शिरपूर तालुक्यातील बाभूळदे शिवारात शेतात ही घटना घडली. डॉ.सरोज पाटील यांचे हे शेत आहे. मात्र त्यावर ताबा बसवण्याच्या वादातून 29 ऑक्टोबरला दुपारी अडीचला संशयित देवा काठेवाडी,  भुरा काठेवाडी, पुना भिल, छायाबाई दाजभाऊ भिल (सर्व रा. बाभुळदे) यांनी मारहाण केली. छायाबाई भिल हिने लाकडी काठीने त्यांच्या पाठीवर व हातावर मारून दुखापत केली तसेच गळ्यात ओढणी टाकून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. याबाबत डॉ.सरोज पाटील यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशययितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक टाकणे तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!