हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

दीड वर्षाने मोबाईल परत मिळाल्याने वृद्ध भावुक, पोलिसांचे मानले आभार

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

नातवाने हौसेने घेऊन दिलेला मोबाईल हरवल्याने वृद्ध कमालीचा निराश झाला. पण पोलिस मात्र स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी अखंड पाठपुरावा करीत तो मोबाईल थेट मध्यप्रदेशातून हस्तगत करुन वृद्धाला परत दिला. ही भेट मिळाल्याने वृद्ध भावुक झाला. त्यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन आभार मानले. एका ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळवून दिल्याने पोलिसांनीही समाधान व्यक्त केले.

धुळे येथील शरद वाणी या 79 वयाच्या वृद्धाबाबत ही घटना घडली. त्यांच्या वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नातवाने त्यांना हा मोबाईल घेऊन दिला होता. त्यामुळे मोबाईलशी त्यांचे भावनिक नाते जुळले होते. दरम्यान दीड वर्षापूर्वी मार्केट परिसरात भाजी खरेदी करतांना त्यांचा मोबाईल हरवला. त्यामुळे ते निराश झाले. त्यातच भर म्हणून ओळखीच्या लोकांनी आता मोबाईल परत मिळेल याची अपेक्षा सोडून द्या असा नकारात्मक सल्ला दिल्याने त्यांच्या दु:खात भरच पडली.
अप्पर अधीक्षक किशोर काळे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या एका कार्यक्रमात काही समस्या असतील तर निसंकोच कळवा असे आवाहन केले होते. त्यामुळे शरद वाणी यांनी आझाद नगर पोलिस ठाणे व सायबर पोलिस ठाणे येथे तक्रार दिली. सायबर पोलिस ठाण्याचे अंमलदार दिलीप वसावे यांनी अथक पाठपुरावा, तांत्रिक विश्लेषण करुन मोबाईलचा छडा लावला. मध्यप्रदेश राज्यातील सुजलपूर येथे मोबाईल असल्याचे निष्पन्न झाल्यावर त्यांनी तो परत मिळवला. 15 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग एम 31 मोबाईल परत मिळवण्यात आला. सायबर सेलचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी शरद वाणी यांना बोलावून सन्मानाने मोबाईल परत केला.

पोलिसांच्या तत्परतेने भारावलेल्या शरद वाणी यांनी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. श्री बारकुंड यांनी त्यांचा सत्कार केला. जून 2023 ते आजअखेर सायबर शाखेने एकूण 36 मोबाईल परत मिळवून दिले आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!