हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

चिंतनभाई भाजपचे नवे शहराध्यक्ष !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

भारतीय जनता पक्षाच्या शिरपूर शहराध्यक्षपदी उद्योगपती चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

तालुकाध्यक्षपदी किशोर विठ्ठल माळी यांनी फेरनियुक्ती करण्यात आली. चिंतनभाई पटेल यांच्या नियुक्तीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन त्यांचे अभिनंदन केले.

भारतीय जनता पक्षाचे धुळे जिल्ह्यातील सात तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष, आठ मोचार्ंंचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, विभाग संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, जिल्हा प्रभारी  स्मिता वाघ यांच्याशी चर्चा करुन बबनराव चौधरी यांनी पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

नूतन पदाधिकारी असे,
धुळे (पूर्व) तालुकाध्यक्षपदी देवेंद्र आण्णा पाटील (कुंडाणे वेल्हाणे), धुळे (पश्चिम) तालुकाध्यक्षपदी रितेश मनोहर परदेशी (कुसुंबा), शिरपूर शहराध्यक्षपदी चिंतनभाई अमरिशभाई पटेल (शिरपूर), शिरपूर तालुकाध्यक्षपदी किशोर विठ्ठल माळी (वाघाडी), शिरपूर सांगवी तालुकाध्यक्षपदी सत्तारसिंग नारखा पावरा (मालकात्तर), शिंदखेडा तालुकाध्यक्षपदी दिपक वसंतराव बागुल (निमगुळ), दोंडाईचा शहराध्यक्षपदी प्रविण हरी महाजन ( दोंडाईचा) यांची निवड जाहिर करण्यात आली आहे. तसेच भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षापदी सौ. धरतीताई देवरे (बोरीस), भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्षपदी विद्याधर पाटील (खोरदड ), भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र (आर. के) माळी (सोनगीर), भाजपा आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्षपदी जयवंत पाडवी (उमर्दा), भाजपा अल्प संख्यक मोर्चा जिल्हाध्यक्षपदी मुबीन शेख (शिरपूर), भाजपा वैद्यकिय सेल जिल्हाध्यक्षपदी डॉ. अतुल बडगुजर (शिरपुर ), भाजपा सोशल मिडीया जिल्हा संयोजक पदी प्रदीप चंद्रशेखर कोतकर (पिंपळनेर), अभियंता प्रकोष्ठ जिल्हा संयोजकपदी विजय नंदन (पानखेडा)

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!