हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भोवळ आली आणि होत्याचे नव्हते झाले !

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

घराचा आधारस्तंभ असलेल्या युवकाला भोवळ आली. तो रस्त्यावर पडला आणि त्याने मान टाकली ती कायमचीच ! या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

भाविन अनिल भदाणे (वय 28) या युवकाचा ऐन तारुण्यात अत्यंत शोककारक मृत्यू झाला. तो शिरपूर तालुक्यातील तर्‍हाडी गावाचा रहिवासी होता. सहा सप्टेंबरला सकाळी तो मित्रांसोबत गप्पागोष्टी करत गावाच्या बसथांब्याजवळ उभा होता. सकाळी साडेदहाला भोवळ येऊन तो खाली कोसळला. त्याला नातलग आणि मित्रांनी तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे.

भाविन शेती करुन चरितार्थ चालवत होता. वर्षभरापूर्वीच भाविनचा विवाह झाला असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!