हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गर्भपाताने मृत्यू, धुळ्याच्या डॉक्टरवर गुन्हा

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

युवतीचा बळजबरीने गर्भपात करुन तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या संशयावरुन धुळे येथील फाशीपुलावरील तुषार हॉस्पिटलचे संचालक डॉ.एम.एस.रघुवंशी यांच्यासह युवकाविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मृत युवती शिरपूर तालुक्यातील एका खेड्यामधील रहिवासी आहे. तिच्याशी संशयित अमृत आनंदा पाटील याने शरीर संबंध ठेवल्याने तिला गर्भधारणा झाली. संशयिताने तिला धुळे येथील डॉ.रघुवंशी यांच्या हॉस्पिटलमध्ये बोलावून तपासले असता चार महिन्यांचा गर्भ असल्याचे आढळले. त्याने गर्भपाताबाबत सांगितले असता तिने नकार दिला. मात्र त्याने नकार देऊन डॉ.रघुवंशी यांच्याकडून तिचा गर्भपात करुन घेतला. गर्भपात करतांना निष्काळजीपणा बाळगल्यामुळे तिच्या गर्भाशयात गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. रक्त साठून राहिल्याने इन्फेक्शन झाले. त्यानंतर काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्या मृत्यूचे कारण समोर आले. तिच्या वडिलांना मोठ्या मुलीने घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन संशयित अमृत पाटील व डॉ.रघुवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!