क्राईम ब्लास्ट ब्यूरो
शिरपूर शहर, शहादा व चोपडा येथून मोटारसायकली चोरणार्या अट्टल चोराला शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून दोन लाख 79 हजार रुपये किंमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
डीवायएसपी सचिन हिरे यांनी ही माहिती दिली. त्यानुसार, शिरपूर शहरातील पित्रेश्वर कॉलनी येथील रहिवासी विशाल रणजीतसिंह चौधरी याची होंडा शाईन मोटारसायकल (एमएच 18, बीटी 5637) सात ऑगस्टला चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास करतांना पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना शहरातील गुजराथी कॉम्प्लेक्स येथे एक संशयित दुचाकी विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या आदेशावरुन शोध पथकाने त्याला अटक केली.
विनोद अशोक कोळी (वय 28, रा.कोठली ता.शहादा) असे संशयिताचे नाव आहे. त्याने चोरीची कबुली दिली. कोठली येथील त्याच्या घरी जाऊन पाहणी केल्यानंतर आणखी चार दुचाकी आढळल्या. त्याच्याकडून एकूण पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत दोन लाख 70 हजार रुपये आहे.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक ए.एस.आगरकर, शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, भटू साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, आरिफ तडवी, मिथून पवार, राम भिल, चेतन भावसार, शरद पारधी यांनी ही कामगिरी बजावली.