हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

समाजकंटकांनी घडवली दंगल… आ. अमरीशभाईंचा थेट आरोप 

क्राईम ब्लास्ट ब्यूरो 
 
तालुक्यातील सांगवी येथे घडलेली दंगलीची घटना अतिशय दुर्दैवी असून शिरपूरसारख्या शांतताप्रिय तालुक्यात अशी घटना घडायला नको होती. या दंगली मागे असामाजिक तत्व काम करत असल्याचे दिसून येत असून तरुण पिढीला भडकवण्याचे व त्यांना चुकीच्या मार्गाने लावण्याचे काम काही समाजकंटक करत असल्याचे दिसून येत आहे. कोणीही कोणत्याही अफवांना बळी न पडता शिरपूर तालुक्याची शांततेची परंपरा कायम राहावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांनी शांतता बाळगावी असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
 
शिरपूर तालुक्यातील सांगवी गावात बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी होऊन जी दंगल घडली, ही घटना अतिशय क्लेशदायक, दुःखदायक असून शांतताप्रिय शिरपूर तालुक्याच्या परंपरेला बिलकुल न शोधणारी घटना घडली आहे.
 
शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा हे अतिशय संयमी, अध्यात्मिक, कुठल्याही वाईट गोष्टींपासून नेहमीच दूर राहणारे असे साधे सरळ व्यक्तिमत्व आहे. जमावाला समजावण्यासाठी गेल्यावर तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेल्यावर आमदार काशिराम पावरा यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याची घटना खूपच दुर्दैवी व दुःखदायक आहे. तहसीलदार, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक झाल्यासारख्या घटनांनी मी खूप व्यथीत झालो आहे. कोणीतरी राजकीय फायद्यासाठी चिथावणी देऊन, युवकांना भडकवून असे कृत्य केलं असेल तर शिरपूर तालुका कदापी अशा लोकांना माफ करणार नाही. शिरपूर तालुक्याची शांतता अबाधित राहावी यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करतो. शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी, सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी, आदिवासी बांधवांच्या नेहमीच प्रगतीसाठी गेल्या 35 वर्षांपासून आम्ही अहोरात्र काम करत आहोत. पूर्वनियोजित कट असल्यासारखी ही घटना घडल्याचे दिसून येत असून कृपया तरुण पिढीने, युवकांनी, आदिवासी बांधवांनी अशा कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये. तसेच व्यसनापासून दूर राहून सर्वांनी चांगले जीवन व्यतीत करावे असे कळकळीचे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.
 

कोणताही अनुचित प्रकार घडला तर आपलेच नुकसान होते, आपला तालुका मागे पडेल. सामंजस्याची व सहकार्याची भूमिका लक्षात ठेवून सर्वांनी चांगल्या भावनेने काम करावे. तालुक्याच्या भल्यासाठी पुढे यावे. आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेला, प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येकाला आमच्या कुटुंबातील सदस्य समजतो व त्या दृष्टीने सर्वांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहतो. यापुढे शिरपूर तालुक्याच्या भल्यासाठी, शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्याच्या भूमिकेतून मार्गक्रमण करावे. कोणत्याही भूलथापांना, अफवांना बळी पडू नका असे आवाहन माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!