हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर मार्केट कमिटीच्या सभापती पदावर के.डी. पाटील बिनविरोध 

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

 

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी के. डी. पाटील व उपसभापती लक्ष्मीकांत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सर्व संचालकांची जनक विला निवासस्थान आमदार कार्यालयात माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी 22 मे 2023 रोजी बैठक घेऊन सभापती पदासाठी के. डी. पाटील व उपसभापती पदासाठी लक्ष्मीकांत पाटील यांची निवड जाहीर केली. यावेळी आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, सर्व संचालक उपस्थित होते.

यावेळी आमदार अमरिशभाई पटेल यांनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सर्व संचालकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
विशेष लेखा परीक्षक व्ही. बी. पापूलकर हे निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल ऐंडाईत यांनी कामकाज पाहिले. निवड प्रक्रिया सकाळी ११ वाजता सुरू झाली.

यावेळी नवनिर्वाचित सभापती पाटील कांतीलाल दगा (के. डी. पाटील), उपसभापती लक्ष्मीकांत बापुराव पाटील, गुजराथी किरण बद्रीनाथ, जमादार शांतीलाल इंद्रसिंग, पाटील अरविंददास आनंदा, पाटील चंदू धोंडू, पाटील शिवाजी धनगर, महाजन विठोबा सिताराम, पाटील मेघा राजेंद्र, मराठे मनीषा राजकपूर, पाटील प्रसाद मोहन, पावरा कृष्णा गेंदराम, राऊळ आनंदसिंग दर्यावसिंग, पावरा जगन सुपा, बोरसे मिलींद दौलतराव, अग्रवाल अर्पित घनशाम, जैन सतिष दगडूलाल, कढरे किरण जतन उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निवडणूक लढविण्यात आली होती.

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३० एप्रिल रोजी मतदान झाले आणि लगेच त्याच दिवशी निकाल घोषित करण्यात आला होता. या निवडणुकीत आमदार अमरिशभाई पटेल यांच्या पॅनेलने सर्व १८ जागांवर एकतर्फी दणदणीत विजय मिळवला होता.

आमदार अमरिशभाई पटेल यांच्या गेल्या 35 वर्षांच्या राजकीय नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाला असून तालुक्यातील सर्वच संस्थांवर त्यांनी निर्विवाद वर्चस्व कायम राखले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!