क्राईम ब्लास्ट ब्यूरो

पक्ष कोणताही असो, अमरीशभाई पटेल यांचे तेथे स्वतंत्र स्थान असते. 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार्या अमरीशभाईंना आज भाजपच्या वरिष्ठ स्तरावरील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये समावेश होतो.
नुकतीच आमदार अमरीशभाई पटेल यांच्या मुंबई येथील एस. व्ही. के. एम. संस्थेच्या मुकेश पटेल ऑडिटोरियम हॉलमध्ये भाजपची मुंबई मोर्चा, आघाडी, प्रकोष्ठ यांची बैठक झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमदार अमरीशभाई पटेल यांच्यासह अनेक बडे नेते या बैठकीस हजर होते.
यापूर्वीही वेळोवेळी भाजपच्या वरिष्ठ आणि अतिमहत्त्वाच्या वर्तुळात अमरीशभाईंचा समावेश होत असल्याचे दिसून आले आहे. शिरपूर तालुक्यातील प्रचंड विकासकामांसह देशाच्या शैक्षणिक क्षेत्रात एसव्हीकेएम संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचे जाळे विणले आहे. त्यांचा दांडगा अनुभव, माणसे जोडण्याची हातोटी अशा गुणांमुळे त्यांना सोबत घेऊनच वाटचाल केली जाते.