हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मद्यार्काची हेराफेरी करतांनाच पडला छापा…

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

मुंबई-आग्रा महामार्गावर 27 एप्रिलला टँकरमधून मद्यार्क (ब्लेंड) काढून हेराफेरी करीत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने छापा टाकला. या कारवाईत दोन जणांना अटक केली असून 52 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सांगवी शिवारातील हॉटेल ओमसाई शेजारी हा गैरप्रकार सुरु होता. हायवेवर गस्त घालणार्‍या भरारी पथकाला संशय आल्याने त्यांनी छापा टाकला. या कारवाईत रामेश्वर उर्फ पप्पू कैलास गायकवाड (वय 32, रा.सांगवी) व टँकरचालक रामजीवन फुलसिंह मीना (वय 35, रा.कानेड ता.बिओरा जि.राजघर, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान टँकर, महिंद्रा कार व महिंद्रा पिकअप अशा वाहनांसह 35 हजार लिटर तयार मद्यार्क असा एकूण 52 लाख 10 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजयकुमार सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, उपायुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील भरारी पथकाचे निरीक्षक ए.एस.चव्हाण, दुय्यम निरीक्षक व्ही.एस.पाटील, ए.जी.सराफ, जवान गोकुळे शिंदे, विठ्ठल हाके, युवराज रतवेकर, भाऊसाहेब घुले यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!