हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मालकातरजवळ दारूची स्मगलिंग

शिरपूर ब्रेकिंग…..चाऱ्यातून साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तालुक्यातील बोराडी-मालकातर रस्त्यावर दारू आणि बियरची तस्करी करणारे वाहन अडवून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

डॉ. विजय सूर्यवंशी (आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क), सुनिल चव्हाण (संचालक),  अर्जुन ओहोळ (विभागीय उपायुक्त),   मनोज शेवरे (अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. निरीक्षक एस.एस. हांडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.

18 एप्रिलच्या पहाटे चार वाजता   बोराडी मालकातर रस्त्यावर बोराडी गावात  सापळा रचून MH18 BG 5819 या वाहनाला थांबण्याचा इशारा केला. परंतु वाहनचालक  वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून अंधाराचा फायदा घेत पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता  सुक्या चाऱ्याच्या गोण्या दिसून आल्या . गोण्या बाजूला करून झडती घेतली असता वाहनामध्ये माउंट बिअरचे 1440 टिन, रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या 1920 क्वार्टर्स बाटल्या आढळल्या. वाहनसह एकूण 9 लाख 41 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फरारी चालक  व वाहनांच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. .एस.एस.हांडे  निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.  शिरपूर विभाग शिरपूर ,   सागर चव्हाण,  गणेश जाधव, दुय्यम निरीक्षक,  एस.एस.गोवेकर स.दु.नि व जवान सर्व शांतीलाल देवरे  गोरख पाटील केतन जाधव, प्रशांत बोरसे, हेमंत पाटील ,मनोज धुळेकर के.एम.गोसावी ,दारासिंग पावारा ,तसेच वाहन चालक .रवींद्र देसले,निलेश मोरे  यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!