क्राईम ब्लास्ट ब्यूरो


तापी नदीवर मोटरसायकल उभी करून उडी टाकलेल्या युवकाचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
मृत युवक अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथील रहिवासी असून त्याचे नाव पंकज शिवदास पाटील (वय 45) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सावळदे ता.शिरपूर येथील पुलावर दोन दिवसांपूर्वी हिरो एच एफ डीलक्स मोटारसायकल उभी आढळली होती. तिच्याजवळ शर्ट, चपला व आधार कार्ड आढळले होते. त्यावर पंकज शिवदास पाटील असे नाव होते.
प्राथमिक अंदाजावरून नदीपात्रात संबंधिताने उडी टाकल्याचा संशय व्यक्त करून शोधास सुरुवात झाली. 10 एप्रिलला दुपारी मृतदेह हाती लागला. तपासणीत तो पंकज शिवदास पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा चुलत शालक तथा खर्दे पाथर्डे येथील रहिवासी भिकन संभाजी पाटील यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.