क्राइम ब्लास्ट ब्यूरो
माझी तातडीने बदली करा, तो पर्यंत मी कामावर जाणार नाही. गावातील एकापासून माझ्या जिवाला धोका आहे असे धक्कादायक पत्र वरिष्ठांना थाळनेर येथील ग्रामविस्तार अधिकारी जी.के.वेताळे यांनी दिले आहे. 10 एप्रिलपासून ते थाळनेरला जाणार नसून अतिरिक्त कार्यभार असलेल्या ग्रामपंचायती सांभाळणार आहेत.
वेताळे थाळनेरला 2017 पासून नियुक्त आहेत. 2023 मध्ये त्यांच्या नियुक्तीला सहा वषे पूर्ण होतील. सात एप्रिलला ते ग्रामपंचायतीमध्ये कामकाज करीत असतांना गावातील वामन रामचंद्र कोळी हा तेथे गेला. त्याने कामकाजासंदर्भात काही प्रश्न विचारले. 29 मार्चला झालेल्या ग्रामसभेच्या प्रोसिडींगबाबत वेताळे यांनी माहिती दिली. मात्र त्यानंतरही संताप व्यक्त करुन कोळी याने टेबल वेताळे यांच्या अंगावर ढकलून दिले. त्यावरील चहा अंगावर सांडल्याने त्यांचे कपडे खराब झाले. कोळी याने त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे आपल्या जीवाला धोका असून यापुढे थाळनेर ग्रामपंचायतीमध्ये न जाता अतिरिक्त कार्यभार असलेल कुवे व विखरण येथील कारभार पाहणार असल्याचे वेताळे यांनी अर्जात म्हटले आहे.
या प्रकारानंतर वेताळे यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा का दाखल केला नाही ?, त्यांना खरोखर जिवाला धोका वाटतो आहे की त्यामागे काही वेगळेच कारण आहे अशी चर्चा परिसरात रंगली आहे.