हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आमचे आमदार, लई दमदार

तालुक्यासाठी आणला हजार कोटींचा निधी

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

राज्यभरात सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी बजावत माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल व आमदार काशीराम पावरा यांनी शिरपूर तालुक्यासाठी तब्बल एक हजार कोटींहून अधिक रकमेचा विकासनिधी खेचून आणला आहे. या निधीतून दुर्गम आदिवासी भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास मदत होणार आहे.

आ.अमरीशभाई, आ.काशीराम पावरा यांनी अखंड पाठपुरावा केल्याने नऊ मार्चला सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल हजार कोटी रुपयांहून अधिक निधी शिरपूरसाठी मंजूर झाला आहे. त्यातील प्रमुख तरतुदी अशा,

1) रस्ते, पूल व दोन शासकीय इमारतींसाठी 187 कोटी सहा लाख 35 हजार रुपये.
2) हायब्रीड अ‍ॅन्युटी मॉडेल (हॅम) अंतर्गत 47 किलोमीटर रस्त्यासाठी साडेपाचशे कोटी.
3) 42 किमी रस्त्यासाठी आशियाई बँकेतून 300 कोटी.
4)अंतुर्लीजवळ पूल, प्रांताधिकार्‍यांच्या निवासस्थानाचे बांधकाम व पळासनेर येथे एक्साईज ऑफिस.
5) सहा राज्य रस्त्यांसाठी 12 कोटी.
6) बिगर आदिवासी भागात 37 कामांसाठी 83 कोटी.
7) आदिवासी भागात 33 कामांसाठी 81 कोटी.

राज्यभरात निधी मिळवण्याचा हा विक्रम मानला जात असून अमरीशभाई पटेल यांच्या पॉवरफुल कामगिरीमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची संधी मिळणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेतून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!