हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर बाजार समितीच्या प्रशासकपदी मनोज चौधरी

प्रशासक मनोज चौधरी यांचे स्वागत करतांना मावळते सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया व संचालक

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदावर धुळे येथील सहायक उपनिबंधक मनोज चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी 15 फेब्रुवारीला कार्यभार स्वीकारला.

बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत 2022 मध्ये संपुष्टात आली होती. त्यांना एका वर्षाची मुदतवाढ दिली होती. दरम्यान, न्यायालयाने एप्रिल 2023 मध्ये निवडणूक होणाऱ्या सर्व बाजार समित्यांवर तातडीने प्रशासक नेमण्याचे आदेश दिले. 10 फेब्रुवारीला श्री चौधरी यांना नियुक्ती बहाल करण्यात आली. औपचारिकता पूर्ण करून त्यांनी 15 फेब्रुवारीला कार्यभार स्विकारला.

मनोज चौधरी यांची सलग दुसऱ्यांदा शिरपूर बाजार समितीवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सहकार क्षेत्रातील कुशल अधिकारी म्हणून प्रसिद्ध असून त्यांच्या प्रशासक पदाच्या काळात बाजार समितीचा कारभार शिस्तबद्धरित्या चालून समिती नफ्यात आली होती. यावेळीही त्यांच्या नियोजनाखाली बाजार समितीची निवडणूक होणार आहे. समितीतर्फे मावळते सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, संचालक युवराज जैन, मोहन पाटील व संचालकांनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!