हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

खंबाळ्याचा लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शेतीच्या सातबार्‍यावर वारसदार म्हणून नाव नोंदवण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी करणारा तलाठी सुर्‍या पायल्या कोकणी याला धुळे येथील अँटी करप्शन ब्यूरोने 31 जानेवारीला दुपारी ताब्यात घेतले.

या प्रकरणातील तक्रारदार हेे खंबाळे येथील रहिवाशी असुन त्यांच्या वडीलांच्या नावे खंबाळे येथे गट नं.44/2अ अशी शेत जमीन आहे. वडील 2017 मधे मयत झाले असून त्यांचे नावावर असलेल्या शेत जमिनीस काही कारणास्तव वारस लावण्याचे राहुन गेले होते. सदर शेतजमिनीच्या 7/12 उतार्‍यावर वारस लावण्याकरीता त्यांनी मौजे खंबाळे येथील तलाठी सुर्‍या कोकणी यांची भेट घेतली असता तलाठी कोकणी यांनी तक्रारदार यांना वारस लावण्याचा आवश्यक कागदपत्रासह अर्ज व त्या सोबत सात हजार रुपये घेवुन ये असे सांगितले. तक्रारदार यांनी धुळे एबीसीच्या कार्यालयातील अधिकार्‍याकडे तक्रार केली. पथकाने शिरपूर येथे 18 जानेवारीला तक्रारदार यांची भेट घेवुन तक्रार नोंदवून घेतली.

तक्रारीची पडताळणी केली असता सुर्‍या कोकणी यांनी मोहिदा गावात तक्रारदाराकडे साक्षीदाराच्या समक्ष सात हजार रुपयांची व नंतर तडजोडी अंती सहा हजार रुपयांची मागणी केली होती. तलाठी सुर्‍या कोकणी याला लाच स्विकारतेवेळी संशय आल्याने लाच न स्विकारता मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूरकडे निघून गेला. त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, हवालदार राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, भुषण खलाणेकर, भुषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, रोहीणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!