हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूरच्या लॉजमधून कोण कोण पळाले ?

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

युवक-युवतींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणार्‍या शिरपूर शहरातील सुदर्शन लॉज येथे पोलिसांनी छापा टाकला खरा, पण पोलिसांची चाहूल लागताच संबंधित तोतामैना फरार झाले. लॉजमालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लॉजमधून फरार झालेल्यांमध्ये कोणाचा समावेश आहे याबाबत खमंग चर्चा रंगली आहे.

शहरातील मेनरोडच्या मागील बाजूस असलेल्या सुदर्शन लॉजमध्ये अश्लील चाळे सुरु असल्याबाबत परिसरातील नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर 28 जानेवारीला शहर पोलिसांनी छापा टाकला. पीआय ए.एस.आगरकर, हवालदार ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, महिला पोलिस पौर्णिमा पाटील, अनिता पावरा, प्रवीण गोसावी, अमित रनमळे, गोविंद कोळी, मुकेश पावरा, सचिन वाघ आदिंनी लॉजमध्ये शिरुन पाहणी केली. मात्र पोलिसांना पाहून युवक युवती पळून गेल्याचे आढळले.

पोलिसांनी लॉजच्या खोल्यांची पाहणी केली असता तेथील गाद्या, बेडशीट, उशी आदि अस्ताव्यस्त अवस्थेत आढळल्या. लॉजच्या काऊंटरवर असलेल्या दर्शन दशरथ पाटील (वय 23, रा.महेशनगर, शिरपूर) याच्याकडे विचारणा केली असता पळून गेलेल्या युवकयुवतींची कोणतीच नोंद नसल्याचे दिसून आले. तसेच त्यांचे ओळखपत्रही त्याने घेतले नव्हते. लॉजमालकाविरोधात हवालदार स्वप्नील बांगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!