हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

सावकारांच्या जाचाला कंटाळून शिरपूरला विद्यार्थ्याची आत्महत्या

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

अवैध सावकारी करणार्‍यांकडून सातत्याने छळ होत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शिरपुरात घडली आहे. विश्वजित विनोद राठोड असे या 17 वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याने 26 जानेवारीला सावळदे येथील पुलावरुन तापी नदीत उडी टाकून जीवनयात्रा संपवली.

विश्वजीत मांडळ शिवारातील साईबाबा अपार्टमेंटसमोरच्या परिसरात राहत होता. त्याचे वडील औरंगाबाद जिल्ह्यात शिक्षक आहेत. शहरातील एका महाविद्यालयात तो अकरावीच्या वर्गात शिकत होता. 26 जानेवारीला दुपारी दोन जण त्याच्या घरी गेले. त्यांनी पैशांवरुन विश्वजीतशी वाद घातला. त्यानंतर संतापाच्या घरात तो मोटारसायकल घेऊन घरातून निघून गेला. कुटुंबिय त्याचा शोध घेत असतांना सायंकाळी साडेसहाला तापी नदीवरील पुलावर त्याची मोटारसायकल उभी दिसली. त्यामुळे नदीपात्रात त्याचा शोध सुरु झाला. 27 जानेवारीला त्याचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मित्रांची मोठी गर्दी झाली होती. बीड जिल्ह्यातील माजलगाव या मूळ गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अवैध सावकारांकडून एकाने घेतलेल्या कर्जाचा विश्वजीतने हवाला घेतला होता. मात्र त्याचा मित्र वेळेत कर्जफेड न करु शकल्यामुळे सावकारांनी विश्वजीतमागे तगादा लावला होता. काही हजार रुपयांचे काही दिवसांतच लाखो रुपयांच्या कर्ज व व्याजात रुपांतर झाले होते. महाविद्यालयीन युवकांना सावकारी पाशात अडकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करणारी मोठी टोळी शिरपुरात कार्यरत असल्याचे वारंवार उघडकीस आले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!