हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिष्याची गुरुदक्षिणा, हेडमास्तरला बेड्या

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

शाळेच्या दाखल्यात दुरुस्ती व बोर्डाचे मार्कशीट आणून देण्याच्या मोबदल्यात सोळाशे रुपयांची लाच घेतांना मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.

शाळेतील माजी विद्यार्थ्याने आपल्या मुख्याध्यापकाला पकडून दिले. 2017-18 मध्ये हा विद्यार्थी शाळेत होता. 14 जानेवारीला तो शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कशीट घेण्यासाठी शाळेत गेला. मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर याने दाखला व मार्कशीट देण्यासाठी त्याच्याकडून पाच हजार रुपये घेतले. त्यात शाळेच्या दाखल्यावर विद्यार्थ्याच्या आईचे नाव चुकीचे नमूद केले होते. ते दुरुस्त करुन द्यावे व दहावीचे मार्कशीट द्यावे अशी मागणी विद्यार्थ्याने केली. त्याच्यासाठी पुन्हा मुख्याध्यापकाने दोन हजार रुपये लाच मागितली. त्याची लालसा पाहून संतापलेल्या विद्यार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पथकाने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला. 17 जानेवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास नवापूर बसस्थानकाजवळ जेबीके केक शॉपीसमोर विद्यार्थ्याकडून सोळाशे रुपये स्विकारतांना शिनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरोधात नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिनकर हा सुळी ता.नवापूर येथील माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!