हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अफवांवर विश्वास ठेवू नका, एसपी बारकुंड यांचे आवाहन

क्राइम ब्लास्ट ब्यूरो

 

 

धुळे येथील महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवून झालेल्या अत्याचार प्रकरणात संशयिताला अटक केली आहे. काही समाजकंटक या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा पोेलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.

आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहाटे ही घटना घडली. संशयिताने पिस्तुलाचा धाक दाखवून अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडीतेच्या फिर्यादीवरुन संशयिताविरोधात भादंवि 376, 452, आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पिस्तूलही जप्त करण्यात आले. मात्र काही विकृत लोक सोशल मिडीयावर या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. जनतेने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

काय म्हणाले एसपी ? : तातडीने गुन्हा दाखल केला. संशयिताला लगेचच अटक करण्यात आली. हत्यार जप्त करण्यात आले. स्वत: मी, डीवायएसपी आणि अन्य सक्षम अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. शांतता कमिटीची मिटींग बोलावून सर्व घटनाक्रम सांगितला व परिस्थिती अवगत करुन दिली. आरसी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स व स्थानिक पोलिस दल विविध जागी तैनात केले आहे. इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाला सर्व वस्तुस्थितीची कल्पना दिली आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. मी स्वत: दाखल गुन्ह्याच्या तपासावर आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पुढे पाठवून गुन्ह्यातील साथीदार बनू नका.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!