हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

टारझनचा जंगलाऐवजी शहरात धुमाकूळ

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शहर आणि परिसरात मोटारसायकली चोरुन धुमाकूळ घालणार्‍या टारझनसह त्याच्या साथीदाराला एलसीबीने अटक केली. संशयितांकडून चोरीच्या तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या.

संशयित लखन उर्फे टारझन सुरेश बारेला (वय 22, रा.अजागिर्‍या ता.वरला, मध्यप्रदेश) व त्याचा साथीदार गणेश उर्फ धनशा शिलदार बारेला (वय 24, रा.कर्जाना ता.चोपडा) हे मोटारसायकल चोरुन विकत असल्याची माहिती जळगाव एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांना मिळाली होती. त्यांनी पथकासह दोघांचा शोध सुरु केला. संशयित गणेश कर्जाना गावात वावरत असल्याची माहिती मिळाल्याने एलसीबी पथक तेथे गेले. रस्त्यात त्यांना दोन्ही संशयित मोटारसायकलवर बसून येतांना आढळले. पोलिसांनी त्यांना हटकले असता मोटारसायकलच्या मालकीबाबत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशयितांना अटक करुन पोलिस ठाण्यात आणले असता त्यांनी अट्टल मोटारसायकल चोर गणेश बारेला याच्यासोबत नाशिक व चोपडा येथून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक एम.रामकुमार यांनी एलसीबीचे अभिनंदन केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!