क्राईम ब्लास्ट ब्यूरो
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 21 नोव्हेंबरला शहरातील पाच कंदील चौकात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांचे दहन केले.
कोश्यारी व त्रिवेदी यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या. जिल्हा उपप्रमुख भरतसिंह राजपूत यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. विभाभाई जोगराणा, अत्तरसिंग पावरा, योगेश सूर्यवंशी, देवाजी पाटील, अभय भदाणे, मंगलसिंग भोई, जितेंद्र पाटील, पिंटू शिंदे, विजय चव्हाण, दिनेश गुरव, सचिन चौधरी, नारायण गवळी, प्रशांत पाटील, स्वप्निल जमादार, जावेद शेख आदी शिवसैनिक उपस्थित होते