हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पिकअप उलटली, 15 जखमी

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

 

 

कपाशी वेचणार्‍या मजुरांना शिरपूरकडे घेऊन येणारा पिकअप उलटून झालेल्या अपघातात सुमारे 15 जण जखमी झाले. हा अपघात दहा नोव्हेंबरला सायंकाळी महामार्गावर हॉटेल गॅलेक्सीसमोर घडला. गंभीर जखमींना धुळे येथे पाठवण्यात आले आहे.

 

 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे आदिवासी वस्तीत राहणारे मजूर कपाशी वेचण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील कलमाडी येथे गेले होते. ते सायंकाळी परत येत असतांना पिकअपचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून वाहन उलटले. या अपघातात इतर मजुरांच्या वजनाखाली दाबले जाऊन व रस्त्यावर आदळल्याने 15 जण जखमी झाले.  त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना धुळे येथे रवाना करण्यात आले.

जखमींची नावे अशी,
दिव्या गोपाल भिल (15), नंदिनी भावसिंग जाधव (15), प्रीती गजेंद्र भिल (9), निलेश नाना भिल (10), काजल देविदास कोळी (16), सोनाली कैलास भिल (25), राजनंदिनी रवींद्र भिल (14), सरिता गोपाल भिल (15), रोहन प्रविण भिल (पाच वर्षे), विकास संजय पवार (15), मंदाबाई कृष्णा भिल (25), राज कृष्णा भिल (10), सूरज पिंटू भिल (10), धनसिंग सीताराम भिल (55), तापीबाई सायसिंग भिल (70),  शांताबाई बारकू कोळी (70).

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!