ट्रक बुडाला, क्लिनर वाचला
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सावळदे गावाजवळ पुलावरून खाली कोसळून ट्रकला जलसमाधी मिळाली.
3 नोव्हेंबरला सकाळी साडेनऊला झालेल्या या अपघातात क्लिनर सुदैवी ठरला. त्याला ट्रकमधून बाहेर काढण्यात मच्छीमाराना यश मिळाले. ड्रायव्हर मात्र दुर्दैवी ठरला असून तो केबिनमध्येच अडकल्याचा संशय आहे.
महाराष्ट्रातून गुलाबजामची पावडर घेऊन हा ट्रक इंदोरकडे जात होता. पुलावर पोहचल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक कठडे तोडून पुलाखाली कोसळला. त्याचवेळी काही मच्छीमार जवळच होडीत होते. त्यांनी तातडीने क्लिनर धर्मेंद्र याला केबिनबाहेर काढले. ड्रायव्हर मात्र अडकला. अपघाताची माहिती मिळताच शिरपूर, थाळनेर व नरडाणा पोलिस ठाण्याची पथके घटनास्थळी पोहचली. ट्रक बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक काही काळ वळविण्यात आली.