शेतकऱ्यांनो, दक्षता घ्या
क्राईम ब्लास्ट ब्यूरो
कृषी उत्पादन वाढीमध्ये रासायनीक खतांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामात एकूण ९२ खतांचे नमुने काढण्यात आले होते. त्यांची तपासणी प्रयोगशाळेमार्फत करण्यात आली असून खालीलप्रमाणे खतांचे नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत.
१) झोकेटेड एस.एस.पो (R.ZG/22 १९2) राम फॉस्फेट लि. उदयपुर, २) २०*२०*००*१३ (१३) कृषक भारती को ऑप लि., ३) चिलेटेड फेरस १२ % (०१) साथ रायके मौकल्स नाशिक, ४) एस.एस.पी. (S-९०) के.पी. आर. अँग्रो केम लि., ५) विद्राव्य १९*१९ *१९ (KJ१२२६१८) के. पी. आर. अॅग्रो केम लि., ६) पी. डी. एम. (A-४) अदिनाथ अॅग्रो इंडस्ट्रीज, ७) १८*१८*१०(०२) श्री अंग्रो क्रॉप सायन्स, ८) १८*१८ *१० (GF-०२) जॉर्डन हायॉरक्स कॉर्पोरेशन, ९) झीकेटेड एस.एस.पी (IPH/ZNP२७) इंडिसन फॉस्फेट लि.. १०) झॉकेटेड एस.एस.पी (IPH/ZNG १००) इंडिसन फॉस्फेट लि. ११) विद्राव्य १९*१९*१९ (००५) निर्मल फटॉलायझर, शिरपुर, १२)सल्फर ९०% (A-४) स्मार्टकेम टेक्नॉलॉजी, १३) झींकेटेड एस.एस.पी (-) पटेल फॉसकेम, १४) पीडीएम (WP-४) निर्माण फर्टीलायझर लि., १५) विद्राव्य १९*१९*१९ (MAX०१) मॅक्सीकन फर्टी अॅण्ड केमीकल प्रा.लि.. १६) बोरॉन २०% (BN-२२०२) कॉन्कर क्रॉप केअर प्रा.लि. मिरज, १७) सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ (ST२२०१) कॉन्कर क्रॉप केअर प्रा.लि. मिरज, १८) १८*१८*१० (GF-०९) जॉर्डन हायरेक्स कॉर्पोरेशन, १९) सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड -२ (B-३) निसर्ग क्रॉप केअर प्रा.लि., २०) सुक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ (121) सह्याद्री सिड्स सायन्स एलएलपी. असे आहेत.
या अप्रमाणित बॅचच्या खतांची शेतकऱ्यांनी खरेदी करु नये. तसेच कृषि निविष्ठा विक्री केंद्र संचालकांनी देखील विविध प्रकारची खते, बियाणे व किटकनाशकांची विक्री करतांना उत्पादकाचा परवाना, ओ फॉर्म, स्टेटमेंट १ व २, प्रिन्सीपल सर्टीफिकेट यांची खात्री करुनच निविष्ठांची शेतक-यांना विक्री करावी अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. त्याचबरोबर शेतक-यांनी खते बियाणे व किटनाशके खरेदी करतांना पक्की पावती घ्यावी असे आवाहन कृषि विकास अधिकारी उज्वल गिरासे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.