हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

यशवर्धन कदमबांडेंचे सीमोल्लंघन कशासाठी ?

क्राइम ब्लास्ट स्पेशल

गुरुवारची सकाळ धुळे शहरासाठी काहीशी धक्कादायकच ठरली. भाजपचे नेते राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र व भाजयुमोचे राज्य पातळीचे पदाधिकारी यशवर्धन कदमबांडे शिवसेनेत गेले हे कळताच चर्चा सुरु झाली. भाजपवाल्यांना आतून खदखद असली तरी त्यांनी हमको कुछ फर्क नही पडता असा आव आणला. राष्ट्रवादी काँग्रेसला चुटपूट लागली आणि काँग्रेसला नेहमीप्रमाणेच काही देणेघेणे नव्हते. शिवसेनेतून मात्र सावध प्रतिक्रिया देण्यात आल्या.

खरेतर दोन वर्षापासून भाजपपासून अलिप्त राहणारे यशवर्धन स्वत:साठी नवा बसेरा शोधताहेत हे लपून राहिलेले नव्हते. राजवर्धन कदमबांडे यांच्याप्रमाणेच त्यांचा स्वभाव रोखठोक आहे. भाजपमध्ये झालेला प्रवेश आणि त्यानंतर आलेली अस्वस्थता ते लपवून ठेवू शकले नाहीत. उद्योग उभारणीच्या लेबलखाली त्यांनी स्वत:ला अलिप्त केले खरे, पण सक्रीय राजकारणाची उर्मी त्यांना फार काळ पडद्याआड ठेवता आली नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून त्यांनी अखेर कोंडी फोडली. आता त्यांच्या या कृतीचे साधकबाधक परिणाम काय होतात, शिवसेनेत त्यांना भवितव्य गवसते का याकडे लक्ष असणार आहे.

धुळे शहराचे एक फार मोठे वैशिष्ट्य आहे. पक्ष कोणताही असो, त्याचे राजकारण धुळे स्टाईलनेच चालते. कोणी कोणत्याही पक्षात जावो, तो धुळेकर स्टाईलनेच वागतो. वरुन येणारे आदेश, ध्येयधोरणे, पॉलिसी, अजेंडा धुळ्यातले पुढारी सरळसरळ कोलतात. त्यामुळे येथील राजकारण नेत्यांच्या अवतीभोवती फिरत असते. राजूबाबांनी राष्ट्रवादी सोडली आणि भाजप जवळ केला. पण राष्ट्रवादीत अद्यापही त्यांना मानणारा मोठा गट आहे. माजी आमदार शरद पाटील यांनीदेखील एक, दोन, तीनदा पक्ष भ्रमंती केली पण त्यांचे कार्यकर्ते कट्टर आहेत, सोडून जात नाहीत. अशी फौज प्रत्येक पुढारी राखून आहे. ही बाब न कळल्यानेच एक साचलेपण निर्माण झाले आहे आणि त्याची परिणीती यशवर्धन कदमबांडे यांच्या दिवाळीपूर्वीच्या सीमोल्लंघनात झाली.

2014 आणि 2019 मध्ये भाजपमध्ये प्रचंड इनकमिंग झाले. अक्षरश: जीव गुदमरावा इतकी गर्दी गोळा झाली. गली का, वॉर्ड का, एरिया का, शहर का शेर असलेले पुढारी भाजपमध्ये जाऊन अक्षरश: ओळख हरवून बसले इतकी दाटी धुळ्यात झाली. त्यात धुळे महापालिकेत सत्ता आणूनही विकासाच्या बाबतीत फार मोठा बॅकलॉग निर्माण झाला आहे. भाजपमध्ये नवे-जुने असे शीतयुद्ध कायम आहे. त्यात वारस म्हणून पुढे येऊ पाहणार्‍यांची अधिक गोची होते. त्यांच्या महत्त्वाकांक्षा प्रचंड आहेत आणि त्यांच्या वाडवडिलांच्या मर्यादाही खूप आहेत. संघटनेत स्कोप नाही, शहरात नागरिकांची प्रचंड नाराजी, काही करायला जावे तर पाय ओढायला स्वपक्षीय सज्ज, दिवसेंगणिक बदलणारे इलेक्शनचे फॉर्म्युले यामुळे युवा वर्गात गोंधळ आहे. त्यापेक्षा जिथे मानमरातब मिळेल, काम करण्यास वाव असेल तिथे जाऊन राहू असा विचार युवकांनी केल्यास त्यात वावगे ते काय ? या पार्श्वभूमीवर ज्यांच्या राजकारणाची पाळेमुळे शहरात आहेत आणि त्याच आधारावर ज्यांना पुढे उभे राहणे भाग पडणार आहे, त्यांनी हद्द ओलांडली तर नवल नाही. पण नव्या राजकारणाची कमाल व किमान मुदत किती ठरते हे पाहणे त्याहून अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!