क्राईम ब्लास्ट ब्यूरो
सध्या परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची हाताला आलेली पिके वाया गेली आहेत. पावसाने टोमॅटो (Tomato) पिकाचे मोठे नुकसान झालं आहे. त्यामुळे सध्या बाजारपेठेत टोमॅटोची आवक घटली आहे. याचा परिणाम दरांवर झाला आहे. यामुळे याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे
यामुळे सध्या टोमॅटोच्या दरात 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे. याचा राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे. वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये (APMC Market) टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो 35 ते 40 रुपयांवर गेले असून, किरकोळ मार्केटमध्ये हाच दर 60 ते 70 रुपये प्रतिकिलो झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात हे दर अजून वाढण्याची शक्यात आहे.
उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत असतो मात्र पावसामुळे त्याची आवक कमी झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचा ओघ पाहता हा दर चढाच राहिल अशी शक्यता आहे. पावसामुळे अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत. यामध्ये टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पावसामुळं शेतमालाचं उत्पादन देखील घटत आहे.