क्राईम ब्लास्ट ब्यूरो
दारात उभ्या आईसमोर मुलीला दुचाकीवरुन पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडल्यानंतर संशयिताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नऊ ऑक्टोबरला सायंकाळी संशयित नितिन राजेंद्र पाटील हा पीडीत मुलीच्या घरी गेला. त्यावेळी मायलेकी घरात होत्या. तुमच्या मुलीसोबत मला लग्न करायचे आहे असे त्याने सांगितले. मुलीच्या आईने नकार दिल्यानंतर त्याने शिवीगाळ केली. तिच्या 18 वर्षीय मुलीस बळजबरीने हात धरुन घेऊन जात गाडीवर बसवले व भरधाव वेगाने पळून गेला. मुलीच्या आईने सोनगीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन संशयित नितीन पाटील (रा.बुरझड) याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक आर.पी.महाले तपास करीत आहेत.