हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

स्मशानात महिलेस गोल का फिरवले ?

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

जादूटोणा करून बहिणीचा जीव घेतल्याच्या संशयावरून महिलेस गावच्या स्मशानात गोल चक्कर मारायला लावल्याने  एकच खळबळ मजली आहे.

या प्रकरणातील संशयित तीन महिला व एका पुरुषाविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नरबळी अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंधक उच्चाटन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाच्या माहितीनुसार नंदुरबार  अक्कलकुवा तालुक्यातील डाबचा कुकरखाडीपाडा येथील रहिवासी मोकण्या खेमा वसावे याची बहीण वजाबाई बोख्या पाडवी हिचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तिला जादूटोणा करून मारून टाकल्याचा संशय त्याला होता. जादूटोण्याचा प्रकार गावातील चमारीबाई होमा पाडवी हिने केल्याचा वहिम त्याच्या मनात रुजला होता. त्यावरून मोकण्या वसावे, त्याची पत्नी हुवलाबाई वसावे, वंती वसावे व रायकाबाई वसावे यांनी 10 ऑक्टोबरला सायंकाळी पाचला चमारीबाईच्या घरी जाऊन दोरीने तिचे दोन्ही हात बांधले. तिला स्मशानभूमीत घेऊन जाऊन गोल चक्कर मारून जमिनीला हात लावून शपथ घेण्यास भाग पाडले. घटनास्थळी तिला मारहाण करण्यात आली. त्यामुळे ती जखमी झाली. तिला मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या जबाबावरून संशयित चौघांविरोधात मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!