हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपुरात अश्विन पौर्णिमा साजरी

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

येथील आयु.विजयानंद शिरसाठ यांच्या निवासस्थानी अश्विन पौर्णिमा साजरी करण्यात आली.

 

भारतीय बौद्धमहासभेचे तालुकाध्यक्ष अशोक लहू ढिवरे अध्यक्षस्थानी होते. सदानंद शिरसाठ व  विजयानंद  शिरसाठ यांनी सपत्नीक व अशोक ढिवरे , कोशाध्यक्ष मंगळे रावसाहेब यांच्याहस्ते भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे  पूजन करण्यात आले.  त्रिसरण, पंचशील, बुद्ध, धम्म, संघ पूजा आशीर्वाद गाथा म्हणण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस बौद्धाचार्य प्रबुद्ध शिरसाठ यांनी विधिसंचलन केले.  पी.वाय.शिरसाठ यांनी प्रास्तविक केले. बी.व्ही.मोरे यांनी अनुमोदन दिले. उपस्थितांचा सत्कार  विजयानंद शिरसाठ व त्यांच्या धम्मपत्नी यांनी केला.  डोंगरे सर यांनी भीमगीत सादर केले. पी.वाय.शिरसाठ यांनी अश्विन पौर्णिमेचे महत्त्व व माहिती सांगितली गौतम महिरे यांनी भगवान बुद्ध यांनी सांगितलेला प्रत्युत्य समुदाय तसेच विनयपिटक या विषयावर  माहिती दिली. ढिवरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरपूर शाखेचे सचिव मिलिंद शिरसाठ यांनी आभार मानले. 19 ते 28 ऑक्टोबर दरम्यान धुळे येथे होणाऱ्या श्रामनेर शिबिरासाठी निधी संकलन करण्यात आले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!