क्राईम ब्लास्ट ब्यूरो
साहेब, मी माझ्या पत्नीचा गळा चार्जर केबलने आवळून तिचा खून केलाय, मला अटक करा अशी विनवणी त्या तरुणाने केली आणि अख्खे तालुका पोलिस ठाणे हादरले.
लव्ह मॅरेज केल्यानंतरचा अवघा तीन वर्षांचा संसार…संसारवेलीवर दीड वर्षांपूर्वी एक गोंडस मुलीच्या रूपाने फुल उमललेले..पण विसंवादाचे थैमान सुरू झाले आणि त्याची परिणीती या भयानक गुन्ह्यात झाली.
जळगाव येथील निमखेडी शिवारातील
ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये जितेंद्र संजय पाटील (वय २५) याने पत्नी कविताचा मोबाईलचार्जरच्या बने गळा आवळून खून केला. पत्नीशी संशयावरून भांडण झाल्याने त्याने हे कृत्य केले. खून करून जितेंद्र पोलिस ठाण्यात हजर झाला.
आहुजानगर परिसरातील शिवधाम मंदिराजवळ ब्रह्मांडनायक अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये जितेंद्र व कविता पाटील हे दांपत्य वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी हे दांपत्य बांभोरी येथून जळगावात राहण्यासाठी आले होते. एक ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पत्ती जितेंद्र याने कविताचा चार्जर केबलने गळा आवळला. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर तो स्वतः तालुका पोलिस ठाण्यात हजर झाला.
अशी झाली अखेर
जितेंद्र मूळ बांभोरी (ता. धरणगाव) येथील रहिवासी आहे. त्याचा आणि कविताचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर त्याला पत्नीच्या वर्तणुकीबाबत संशय आला. त्यासंदर्भात पत्नीला अनेकवेळेस समजावले. परंतु ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. बदनामी टाळण्यासाठी तिच्यासाठीच मी गाव सोडून जळगावात मुद्दाम तिचे माहेर असलेल्या शिवधाम मंदिर परिसरात स्थायिक झालो. मात्र, पत्नीच्या वागणुकीत बदल झाला नाही. कविताला जीव तोडून समजावले. पण, ती उलट मलाच आत्महत्या करून फसवून टाकण्याची धमकी देत होती. आजही तिला समजून सांगत असताना वाद घातला. वाद टोकाला गेला अन् मोबाईल चार्जरों वायरने गळफास देत मीच तिची हत्या केली असे जितेंद्र याने पोलिसांना सांगितले.