हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बिजासनी मंदिरासमोर भीषण अपघात, एक ठार

बिजासनी मंदिरासमोर भीषण अपघात, एक ठार

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बडी बिजासन माता मंदिरासमोर कंटेनर ट्रकच्या मागील बाजूला धडकून झालेल्या अपघातात चालक ठार झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कंटेनरची केबिन तोडून चालकाला बाहेर काढावे लागले.

29 सप्टेंबरला मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. दोन्ही वाहने सेंधव्याकडून शिरपूरच्या दिशेने येत होती. बिजासन देवी मंदिरासमोर उतारावर कंटेनर (एमपी 09, एचजी 4910) च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात जाऊन कंटेनर पुढे चालणाऱ्या ट्रक (एमपी 09, एचजे 6660) च्या मागील बाजूस धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, कंटेनरची मजबूत केबिन पूर्णतः चेपली गेली. चालक केबिनमध्ये दाबला गेला. बिजासन चौकी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. केबिन तोडून त्याला बाहेर काढले. तोपर्यंत त्याचे निधन झाले होते. बिजासन चौकीचे प्रभारी सुरेश पाटीदार यांनी सांगितले की, मृताची ओळख त्याच्या खिशातील आधार कार्डवरून पटली. मृताचे नाव मोहम्मद अश्फाक मन्सूर शाह (वय 62, रा.बदनावर जि.धार, मध्यप्रदेश) आहे. रात्रीच्या सुमारास वाहनांची संख्या कमी असल्यामुळे अपघातात संभाव्य मोठी प्राणहानी टळली असे बघ्यांनी सांगितले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!