हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

पगार बंद केल्यामुळे खवळलेल्या कर्मचाऱ्याने कार्यकारी अभियंता महिलेस अश्लील शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना सार्वजनिक बांधकाम विभागात घडली.

धुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा महेश घुगरी (वय 53) यांना शिवीगाळ झाली. संशयित सुधीर ईश्वर मगर (रा.साक्री रोड, धुळे) हा त्यांच्या कार्यालयात शिपाई आहे. त्याचा तीन महिन्यापासून पगार बंद आहे.  22 सप्टेंबरला दुपारी सव्वातीनला वर्षा घुगरी कार्यकारी अभियंता दालनात बजेटच्या कामाबाबत मिटिंग घेत होत्या. त्यावेळी संशयित मगर याने तेथे जाऊन तू मला पगार का देत नाहीस असे विचारून अश्लील शिवीगाळ केली. तू ऑफिसबाहेर निघ, तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत वर्षा घुगरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुधीर मगर याच्याविरोधात धुळे शहर पोलिस ठाण्यात भादंवि 353, 294, 186, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!