हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आशा वर्करचा विनयभंग ! एकावर गुन्हा

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

सर्व्हेच्या माहितीत दुरुस्ती करण्याच्या नावाखाली आशा वर्करला बोलावून घेत तिचा विनयभंग केल्याच्या संशयावरून आरोग्यसेवकाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 14 सप्टेंबरला सकाळी पावणेबाराला वकवाड (ता.शिरपूर) येथील आरोग्य उपकेंद्राच्या क्लिनिक रूममध्ये घडली.

पीडित 30 वर्षीय आशा वर्कर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 14 सप्टेंबरला सकाळी नऊला तिने गावात कुष्ठरोग व क्षयरोग विषयक माहिती गोळा केली. संकलित केलेली एकत्रित माहिती तिने आरोग्य सेवक महेश विषयी यांच्या मोबाईलवर व्हाट्सएपने पाठवली. काही वेळाने तिच्यासोबत आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या मोबाईलवर संपर्क करून महेश ईशी याने तुमची माहिती चुकली असून आपल्याला पुन्हा गावात सर्व्हे करावा लागेल, तुम्ही उपकेंद्रात या असे सांगितले. त्यामुळे संबंधित महिला पावणेबाराला वकवाड येथील आरोग्य उपकेंद्रात गेली. तेथील क्लिनिक रूममध्ये गेल्यावर महेश ईशी याने जवळ बोलावून घेत तिचा विनयभंग केला. संबंधित महिला रागावून घरी निघून गेली. मैत्रिणीला हा प्रकार सांगत असताना संशयित पुन्हा तिच्या घरी आला. त्याने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. काही वेळाने महिलेचा पती घरी आल्यावर तिने हा प्रकार सांगितला. त्यानंतर पती-पत्नीने सांगवी पोलीस ठाणे गाठून संशयिताविरोधात फिर्याद दिली. त्यावरून सांगवी पोलिस ठाण्यात संशयित महेश देवराम ईशी याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!