हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मोर्चा स्थगित, प्रमाणपत्रे मिळणार !

मोर्चाच्या इशाऱ्यानंतर वन विभागाचे धाबे दणाणले, 30 पर्यंत देणार प्रमाणपत्रे

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना वनपट्ट्यांच्या सातबारा वितरणाचे काम संथ गतीने सुरू असून 15 सप्टेंबरपर्यंत त्याला वेग न मिळाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा आमदार काशीराम पावरा यांनी दिला होता. त्यानंतर वन विभागाचे धाबे दणाणले असून 30 सप्टेंबरपर्यंत  उर्वरित सातबारा तयार करून वितरित केले जातील, त्यामुळे मोर्चा काढू नये अशी विनंती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमदार काशीराम पावरा यांना केली. त्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला आहे.

मोर्चा स्थगित करीत असतानाच पीकपेरा नोंदणीसह सर्व वन सातबारे वाटप करण्यात यावेत अशा सूचना माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांनी दिल्या आहेत

शिरपूर तालुक्यातील वन जमिनी पट्टे आदिवासीच्या नावावर व्हाव्यात म्हणून आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शिरपूर तालुक्यातील हजारो वनदावे मंजूर झाले असतांना तालुक्यात आदिवासी बांधवांना वन सातबारे वाटप करण्याचे काम मात्र वन विभागातर्फे संथ  गतीने सुरू होते. आमदार काशिराम पावरा यांनी वनसंरक्षक प्रादेशिक धुळे उप वनसंरक्षक धुळे वनविभाग धुळे यांना 7 सप्टेंबर 2022 रोजी पत्र देऊन अनुसूची-जे (वन सातबारे) वाटप लवकर करण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. जिल्हा समितीने मंजूर करून देखील वन हक्क दावे धारकांना वन सातबारे उतारे अजूनही मोठ्या प्रमाणात मिळाले नसल्याने विविध शासकीय योजना, पंतप्रधान पिक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती लाभ असे अनेक योजनांच्या लाभासाठी पीक पेरा नोंदणी होणे गरजेचे आहे. वनविभागाचे अक्षम्य दुर्लक्ष व दिरंगाईमुळे वन हक्क धारक शासनाच्या विविध लाभांपासून वंचित राहू नये. कोणीही अधिकारी व कर्मचारी यांनी आदिवासी बांधवांकडून पैशांची अपेक्षा करू नये. सर्व वन हक्क दावेदारांना त्यांचे सातबारे 15 सप्टेंबर 2022 पर्यंत मिळण्याबाबत आ. काशिराम पावरा यांनी पत्र व्यवहार केला होता. वनपट्टेधारक आदिवासी शेतकरी बांधवांसह आमदार काशिराम पावरा यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

या पत्राची दखल घेऊन धुळे वनविभागाचे उप वनसंरक्षक (प्रा) व्ही. व्ही. होशिंग यांनी आमदार काशिराम पावरा यांना पत्र देऊन विनंती केली की, शिरपूर तालुक्यातील प्राप्त जोडपत्र-2 पैकी शिल्लक राहिलेले अनुसूची-जे वन हक्क दस्तऐवज 30 सप्टेंबर 2022 पर्यंत तयार करून वाटप करण्याची दक्षता घेत आहोत. म्हणून आमदार काशिराम पावरा व संबंधित आदिवासी शेतकरी बांधव यांनी मोर्चा न काढता सहकार्य करण्याची विनंती केली. यानुसार, आमदार काशिराम पावरा यांनी 15 सप्टेंबर 2022 रोजी वनविभागाच्या कार्यालयावर नियोजित मोर्चा स्थगित केला असून 30 सप्टेंबर 2022 पर्यंत संबंधित सर्वांना वन सातबारे अनुसूची जे देण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!