हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मंजूर ! मंजूर ! मंजूर !

शिसाका भाडेतत्वावर देण्याचा ठराव एकमताने मंजूर

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

शिरपूर शेतकरी साखर कारखाना भाडेतत्वावर देण्यात यावा अशा मागणीचा ठराव कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (दि.10) एकमताने मंजूर करण्यात आला. या ठरावानंतर शिसाका भाडेतत्वावर देऊन सुरु करण्याच्या हालचालींना वेग येईल अशी अपेक्षा शेतकरी, सभासदांनी व्यक्त केली.

शिसाकाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभासदांची सर्वसाधारण सभा बोलावली होती. स्वातंत्र्यसैनिक शंकरनाना लॉन्समध्ये आयोजित सभेत माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, प्रियदर्शनी सूतगिरणीचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ.तुषार रंधे, शिसाकाचे उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल, के.डी.पाटील, नारायण चौधरी, नरेंद्रसिंह सिसोदिया, संग्रामसिंह राजपूत, जि.प.सदस्य देवेंद्र पाटील, संचालक डिगंबर माळी, राहुल रंधे, भरत पाटील, वासुदेव देवरे, योगेश बोरसे आदिंसह तालुक्यातून शिसाकाचे सभासद उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी प्रास्तविकात शिसाकाच्या सभेचा उद्देश सांगून अजेंडा सादर केला. त्यांनी शिरपूर साखर कारखाना सुरु करण्यासाठी भाडेतत्वावर देण्यात यावा अशा मागणीचा ठराव सभेसमोर मांडला. शेतकरी विकास फाऊंडेशनचे मोहन साहेबराव पाटील यांनी ठरावाला अनुमोदन देऊन शिसाका तातडीने सुरु करण्याची कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. सभासदांमधून आवाजी बहुमताने तो मंजूर करण्यात आला. त्यानंतर मानव एकता पार्टीचे अध्यक्ष सुभाषसिंह जमादार यांनी मनोगत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र सभा संपली असल्याचे कारण देऊन त्यांना थांबवण्यात आले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. शिरपूर साखर कारखाना 12 वर्षापासून बंद अवस्थेत असून जनरल मिटींगच्या ठरावानंतर तो कधी सुरु होईल याची सभासदांना प्रतिक्षा लागून आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!