हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

महिलेची छेड काढणाऱ्याची धुलाई

महिलेची छेड काढणाऱ्याची धुलाई

क्राईम ब्लास्ट ब्यूरो
गणेशोत्सवात महिलेची छेड काढणाऱ्या विकृत व्यक्तीला जमावाने बेदम चोपल्याची घटना शिरपूर शहरात निमझरी नाक्यावर घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चार सप्टेंबरला रात्री निमझरी नाका येथे एकाला चार ते पाच जणांनी घेरून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. काही कळण्याच्या आतच जमाव जमला. संबंधित व्यक्तीने महिलेची छेड काढल्याचे कळताच जमावानेही हात धुवून घेतला. गणपती मंदीर रस्त्यापासून उड्डाण पुलापर्यंत संबंधिताची वरात काढण्यात आली.

निमझरी नाका परिसरात एका महिलेचा संशयित पाठलाग करीत होता. प्रारंभी तिने दुर्लक्ष केले. मात्र त्याचा त्रास वाढल्यावर तिने पतीला सांगितले. त्यानंतर पतीसह जमावाने त्याची यथेच्छ धुलाई केली. संशयित सुमारे 35 ते 40 वर्षाचा आहे. निमझरी नाका परिसरात दररोज हाणामारीच्या घटना घडत असून पोलिसांनी तेथे बंदोबस्त लावण्याची गरज आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!