हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मुलीची विक्री करून बलात्कार !

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

पाहुणी म्हणून घेऊन गेलेल्या अल्पवयीन मुलीची साडेतीन लाख रुपयांत विक्री झाली. खरेदी करणाऱ्याने तिच्याशी बळजबरीने लग्न लावले. तिला घरात ठेऊन बलात्कार केला. या घटनेमुळे नंदुरबार जिल्ह्यात खळबळ माजली आहे.

धडगाव तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. मार्च महिन्यात मुलीच्या बापाकडे त्याचे परिचित व राडीकलम ता.धडगाव येथील रहिवासी संदीप सुकलाल पावरा व संगीता संदीप पावरा आले होते. त्यांची नजर घरातील अल्पवयीन मुलीवर पडली. तिला काही दिवसांसाठी पाहुणी म्हणून घरी घेऊन जातो अशी गळ त्यांनी घातली. मुलीच्या बापाने त्यास संमती दिली.

घरी नेल्यावर काही दिवसातच पावरा दाम्पत्याने टेम्भुर्णी ता.माढा जि.सोलापूर येथील सुकऱ्या महाडिक याच्या मध्यस्थीने तीन लाख 60 हजार रुपयात आलेगाव जि. सोलापूर येथील गोविंद याला विक्री केली. गोविंदने तिच्याशी बळजबरीने विवाह केला. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले असे तिच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. संशयित महाडिक, गोविंद, पावरा दाम्पत्य व गोविंदचे आईवडील यांच्याविरोधात धडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!