हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

उताऱ्यावर कुळाचे नाव नोंदवण्यासाठी आठशे रुपयांची लाच स्वीकारताना होळनांथे येथील तलाठी डी.जे.बोरसे याला धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह पकडले.

23 ऑगस्टला सकाळी ही कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर महसूल विभागात खळबळ माजली आहे.

यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तक्रारदार शेतकऱ्याच्या  उताऱ्यावर कुळाची नोंदणी करून घेण्यासाठी  तलाठी डी.जे.बोरसे यांनी आठशे रुपयांची मागणी केली होती. मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी धुळे येथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर विभागाच्या पथकाने 23 ऑगस्टला सकाळी सापळा रचला. त्यात तलाठी डी.जे. बोरसे आठशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला.  त्याला थाळनेर पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!