क्राईम ब्लास्ट ब्यूरो

श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी निलंबित केले आहे. पीडीत मुलीची फिर्याद दाखल करून घेण्यास उशीर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. श्री शेखर यांच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही कारवाई केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षापूर्वी श्रीरामपूर येथील संशयित इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर याने 16 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तीन वर्षांपूर्वी शाळेतून पळून नेले होते. तिचे बलपूर्वक धर्मांतर करून तिच्यासोबत निकाह केला. तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले होते. त्यामुळे विद्यार्थिनी गर्भवती झाली होती. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेली फिर्याद दाखल करुन घेण्यात सानप यांनी विलंब केल्याची तक्रार वरिष्ठ स्तरावर करण्यात आली. तिच्या चौकशीसाठी उपअधीक्षक मिटके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी केलेल्या चौकशीत सानप दोषी आढळले. त्यांनी अहवाल दिल्यानंतर फिर्याद दाखल करुन घेण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवून सानप यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले.
सानप यांनी यापूर्वी शिरपूर शहर पोलिस ठाणे व धुळे येथेही सेवा बजावली आहे.