हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

वेश्याव्यवसाय करणाऱ्या चार युवतींना पकडले

क्राईम ब्लास्ट ब्यूरो

हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या बांगलादेशातील युवतींना पोलिसांनी 18 ऑगस्टला छापा टाकून अटक केली.

या घटनेमुळे मुंबईत राहून देहविक्री करणाऱ्या सेक्स रॅकेटची पाळेमुळे शहरापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले आहे.  जळगाव शहरातील अजिंठा रोडवरील एका हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुनील पाटील, गणेश देशमुख, रवींद्र मोतीराया, किरण धनके, निलेश पाटील, महेश महाले, निनल साखळीकर, अभिलाषा मनोरे, जुबेर तडवी, सलीम तडवी, समाधान पाटील यांच्यासह आरसीपी प्लॅटून, जिल्हा पेठ व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला.

पोलिसांना पाहून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी पळ काढला. मात्र तेथील सफाई कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी खोल्यांची झडती सुरू केली. त्यात भरत सोनवणे, समरूद्दीन शेख यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासोबत चार मुली  आढळल्या. त्यांच्याकडे असलेल्या ओळखपत्रात बिहारसह मुंबई येथील पत्ता नोंदवलेला आहे. मात्र प्राथमिक चौकशीत त्या बांगलादेशी असल्याचे आढळले. हॉटेल मालक सागर सोनवणे, सपना पाटील व श्याम नामक व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!